सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्थैर्य आणि विकासासाठी भाजपाला साथ द्या

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विधानसभा प्रचारार्थ पेडणे, थीवी आणि शिवोलीत जाहीर सभा संपन्न...

Snehal Joshi . BJP Goa
  • Feb 8 2022 10:55PM

पणजी*, दि. ८ :
माझ्या खात्याने गोवा राज्याला आजवर ४० हजार कोटींचा निधी देऊन पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. मुंबई ते गोवा महामार्गासाठी मोठा निधी दिला. स्व. मनोहर पर्रीकर आणि खासदार श्रीपाद नाईक यांच्या आग्रहामुळे मोपा विमानतळ साकारत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आज सायंकाळी पेडणे, थीवी आणि शिवोली मतदारसंघात कोपरा सभा घेतल्या. या तिन्ही ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

पेडणे येथील सभेत बोलताना ते म्हणाले, भाजपा सरकारच्या काळात पेडणेचा विकास होणे सुरू झाले. स्व. पर्रीकर यांच्या स्वप्नातील गोवा घडवण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रयत्नशील आहेत. मुंबई - गोवा महामार्ग पूर्णत्वास येत आहे. यापुढे गोवा - कर्नाटक महामार्ग होणार आहे. यासाठी मी १५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गोव्यातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने भरीव निधी दिला असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले.

पेडणेतील नियोजित आयुष हॉस्पिटल, स्पोर्ट सिटी, मोपा विमानतळ हे प्रकल्प भाजपाच्या काळात उभे राहत आहेत. या सर्व ठिकाणी स्थानिक युवकांना रोजगार मिळेल. तर हजारो युवकांना अप्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळेल.
पेडणेतील सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उमेदवार प्रवीण आर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इतर मान्यवरांची भाषणे झाली.

थीवी येथील सभेत बोलताना मंत्री गडकरी म्हणाले, गेल्या दहा वर्षांत भाजपाने देशात आणि गोव्यात मोठा विकास केला आहे. कधीकाळी राजकीयदृष्ट्या अस्थिर गोवा म्हणून प्रसिद्ध होता. पण भाजपाने सलग दहा वर्षे स्थिर आणि पारदर्शी सरकार दिले. यामुळे लोकांचा भाजपवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे.

थीवी येथील सभेला प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उमेदवार निळकंठ हळर्णकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शिवोली येथील सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना मंत्री गडकरी म्हणाले, सध्या खाणी बंद असल्याने राज्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. या गोष्टीचा विचार करून भाजपाने राज्यातील पर्यटन दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे. पुढील काळात राज्यातील खाणीही सुरू केल्या जातील. पर्यटन पुरक उद्योग निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. आपल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल. श्री. गडकरी यांनी या तिन्ही ठिकाणी विकास आणि पारदर्शक कारभारासाठी भाजपाला प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन केले.

शिवोलीतील सभेस मंत्री श्रीपाद नाईक, उमेदवार दयानंद मांद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते. गडकरी यांच्या दौऱ्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या सभांवेळी स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.ते. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार