सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुवर्णमय गोवा ,समृद्ध गोवा आत्मनिर्भर गोवा, विकसित तसेच स्वयंपूर्ण गोवा करू... शहा

दहा वर्षात भाजपने जो विकास केलेला आहे. जे विकास प्रकल्प गोवाभर उभे राहिलेले आहेत आणि त्याचे दर्शन सर्वानाच घडत आहे . शंभर टक्के लसीकरण असो वा विविध योजनांची अंमलबजावणी असो भाजपनेच केलेले आहे .

Snehal Joshi .
  • Feb 10 2022 8:19AM

डिचोली*  : ता. ९
केंद्रात आणि गोव्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यास गोव्याचा सर्वांगीण विकास होतो. गेल्या सात वर्षात  हे सिध्द झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोव्यामध्ये भाजपाचे सरकार आणून गोव्यात भाजपच्या विजयाची हॅट्ट्रीक करा. असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज डिचोली येथे केले.

  भाजपचे उमेदवार  सभापती राजेश पाटणेकर यांच्या प्रचारार्थ येथील झाट्ये सभागृहाच्या समोर आयोजित जाहीर सभेत अमित शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे , उमेदवार राजेश पाटणेकर, कर्नाटकाचे मंत्री बसवराज,  महाराष्ट्रातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रवीन दरेकर ,महाराष्ट्राचे आमदार रोहन नार्वेकर ,
नगराध्यक्ष कुंदन फळारी, माजी नगराध्यक्ष सतीश गावकर ,भाजपाचे डिचोली मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, इतर नगरसेवक, सरपंच उपसरपंच व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते .

यावेळी बोलताना अमित शहा यांनी सांगितले की भाजपचे नेतृत्व आणि काँग्रेसचे नेतृत्व याची  मतदारांनी तुलना करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने देशाला बलशाली केले .सुरक्षित केले. संरक्षित केले आणि पाकिस्तानला  मुहतोड जवाब देऊन  ४७० कलम रद्द केले, सर्जीकल  स्ट्राईक केला. भाजपा हा नागरिकांना स्वाभिमानाने जगण्यास शिकवणारा पक्ष आणि स्वाभिमान प्रदान करणारा पक्ष आहे. त्यामुळे केंद्रात असे भाजपाचे सरकार आहे तसेच ते गोव्यात असायला हवे यासाठी  डिचोलीतून राजेश पाटणेकर यांना निवडून  द्या. असे आवाहन शहा यांनी केले. भाजपने नेहमीच स्थिरता आणि विकास केलेला आहे .तर काँग्रेसने नेहमीच अस्थिरता आणि  अरिजकता पसरवली आहे. दोन्ही पक्षातील हाच फरक गोव्यात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आणण्यास उपयुक्त ठरेल असेही शहा  म्हणाले.

सुवर्णमय गोवा ,समृद्ध गोवा आत्मनिर्भर गोवा आणि विकसित तसेच  स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पुन्हा पाच वर्षे गोवेकरांनी देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. दहा वर्षात भाजपने  जो विकास केलेला आहे. जे विकास प्रकल्प गोवाभर उभे राहिलेले आहेत आणि त्याचे दर्शन सर्वानाच घडत आहे . शंभर टक्के लसीकरण असो वा विविध योजनांची अंमलबजावणी असो  भाजपनेच केलेले आहे .

भाजपच्या नव्या संकल्पना पत्रामध्ये भाजपाने एका कुटुंबाला तीन सिलेंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे .त्याचबरोबर घर बांधण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज  देतानाच चशघर नसलेल्यांना घर बांधून दे ण्यात येणार आहे. अशा अनेक योजना या संकल्प पत्रात आहेत. आणि भाजप जे सांगतो ते करतो त्यामुळे हा जाहीरनामा प्रत्यक्षात आणण्यासाठी गोव्यात भाजप सत्तेवर हवा असेही अमित शहा म्हणाले . केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना फक्त  ४३२ कोटी केंद्राने दिले होते तर भाजपच्या सरकारने  २५०० कोटी देतानाच चार हजार कोटींचे रस्ते गोव्यामध्ये बांधले आहेत. विविध प्रकल्पासाठी करोडो रुपये अर्थसहाय्य केंद्र सरकार गोव्याला देत आहे. कारण डबल इंजिनच्या सरकारचा हाच तर फायदा असतो. याची जाणीव लोकांनी ठेवावी  असे शहा म्हणाले.
आम आदमी पक्ष आणि तृणमूल यांनी नेहमीच केंद्र सरकारला असहकार्य केल्याने त्या राज्यातील लोकांना केंद्राच्या योजनांचा लाभ मिळत नाही.
याचीजाणीव मतदारांनी ठेवण्याची गरज असल्याचेही अमित शहा म्हणाले.

राजेश पाटणेकर एक कार्यतत्पर आमदार आहेत. घरोघरी पोहोचलेले नेते आहेत . भाजपचे जचे  २२ प्लसचा  जो संकल्प केला आहे तो पूर्ण करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असून हा संकल्प मतदारच पूर्ण करू शकतात असेही ते म्हणाले .भाजपने देशाला अखंड केलेले आहे आणि चांगले देणाऱ्या पक्षाकडे सत्ता  असल्यास सर्वसामान्यांचा, राज्याचा आणि देशाचा विकास होतो . हे सगळ्यांनाच दिसून आलेले आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवून मतदानाला जावे आणि राजेश पाटणेकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे. असे आवाहन अमित शहा यांनी  शेवटी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे  विकसीत भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्रात भाजपचे सरकार आहे. तसेच गोव्यामध्ये सुद्धा  भाजपचे  सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे . आमच्यात मनोहरभाई पर्रीकर नाहीत मात्र त्यांचा आशीर्वाद भाजपला आहे. तसाच तो डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांना आहे. त्यामुळे  १४ रोजी भाजपला मत देऊन डबल इंजिनचे सरकार पुन्हा एकदा गोव्यात आणा आणि  स्वयंपूर्ण गोवा करण्याचे सरकारचे ध्येय पूर्ण करा असे आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी यावेळी केले. त्रुणमुल काँग्रेसने पश्चिम बंगाल  मतदानानंतर  १४० भाजप कार्यकर्त्याची हत्या केली होती याची जाणीव ठेवा  मगो त्रूणमुलच्या अभत्र युतीला दुर करा. असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले .

डिचोली हा भाजपचा बालेकिल्ला आहे आपल्या तालुक्यामध्ये असल्यामुळे डिचोलीची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती जबाबदारी पार पाडून भाजपचे हात बळकट करण्यासाठी डिचोलीच्या मतदारांनी प् राजेश पाटणेकर यांना मंत्री होण्यासाठी पाठवावे .असे आवाहन  मुख्यमंत्र्यांनी केले .

याप्रसंगी बोलताना उमेदवार राजेश पाटणेकर म्हणाले की आपणलोकांच्या सुख दुखात नेहमी समरस झालेलो आहे. घराघरात आपला संपर्क आहे. लोकांच्या प्रेमामुळे आपण पुन्हा पुन्हा निवडून येत आहे . यावेळीही  आपणास निवडून द्या .असे पाटणेकर म्हणाले.

जिथे जिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचाराला जातात तेथे भाजपचा विजय निश्चित असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. डॉक्टर सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारने गोव्याचा भरीव विकास केलेला आहे  त्यासाठी  भाजपला निवडून द्या असे दरेकर म्हणाले. तानावडे यांचेही भाषण झाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार