जुन्या पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून नागपुरात आंदोलन सुरु आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी, या मागणीसाठी राज्य सरकारी - निमसरकारी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने १४ तारखेपासून बेमुदत संप पुकारला आहे. १९८२ मध्ये शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू केली होती. मात्र महाराष्ट्र शासनाने ही पेन्शन योजना बंद करून शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप केला जात आहे. ही पेन्शन योजना सर्वात शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना पूर्ववत सुरू करण्यासाठी नागपुरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या संपात १७ लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी संघाच्या वतीने मंगळवारी विधानभवनावर मोर्चाही काढण्यात आला होता. सरकारने जुनी पेन्शन लागू केली नाही तर १४ डिसेंबरपासून सरकारी - निमसरकारी कर्मचारी काम बंद करतील, असा इशारा आमदार किरण सरनाईक यांनी दिला आहे.