सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंढेंना सहआरोपी करण्यासह फाशीची मागणी

जनभावना लक्षात घेऊन कारवाई करण्यात यावी अन्यथा जनमनातील आगीचा भडका होऊन महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, अशा आशयाचे निवेदन चाळीसगाव तहसीलदार यांना देण्यात आले.

Sudarshan MH
  • Mar 6 2025 12:09AM
चाळीसगाव: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी रोजी चाळीसगाव तालुक्यातील सर्व धर्मीय सर्वपक्षीय नागरिक यांच्याकडून चाळीसगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हैवानालाही लाजवेल अशा निर्दयी आणि क्रुर हत्येचा खटला अती जलद न्यायालयात चालवून त्यांच्या सर्व मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्यावी तसेच हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हे ज्या धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय अगदी खासमखास आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे आणि त्या धनंजय मुंडे यांनी काल केसचा तपास पूर्ण झाल्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे म्हणजे तपास अधिकाऱ्यांवर तपास सुरू असतांना पुरेपूर दबाव टाकून सर्व काही मनासारखे करून घेतले आणि मग राजीनामा दिला आहे. म्हणून गरज पडल्यास या प्रकरणाचा तपास हा पुन्हा योग्य दिशेने केला जावा, तपास कालावधीत तपास अधिकाऱ्यांना कोणी कोणी फोन केलेत? त्याचा सीडीआर रिपोर्ट काढून दबाव आणणाऱ्याची नावे जाहीर करावी आणि त्यांचे वर कारवाई करावी. 
 
तरी जनभावना लक्षात घेऊन कारवाई करण्यात यावी अन्यथा जनमनातील आगीचा भडका होऊन महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, अशा आशयाचे निवेदन चाळीसगाव तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी असंख्य नागरिक उपस्थित होते.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार