सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जामखेड तालुक्यात चंदन तस्करावर वनविभागाची मोठी कारवाई; चंदन तस्करा विरोधात गुन्हा दाखल

वनविषयक गुन्ह्याबाबत अथवा वन विषयक गुन्हे घडत असले बाबत काही माहीती असल्यास वनपरिक्षेत्र कार्यालय कर्जत/वनपरिमंडळ कार्यालय जामखेड यांचेशी त्वरीत संपर्क करावा. असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक राहुरी गणेश मिसाळ व वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके कर्जत जामखेड यांनी केले आहे.

Sudarshan MH
  • Feb 15 2025 8:06AM
जामखेड: जामखेड तालुक्यात चंदन तस्करी होत आहे, अशी गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्याने वनविभागाने सदर ठिकाणी बनावट गिऱ्हाईक बनवून चंदन साठा जप्त करत चंदन तस्करा विरोधात वन नियमावली नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन दिवसंची वन कस्टडी दिली आहे.
 
दिनांक १०/०२/२०२५ रोजी दुपारी १५.०० वा. मौजे जवळके ता. जामखेड या ठिकाणी चंदनाची तस्करीव चंदनाचा साठा असलेची गोपनिय माहिती मिळाल्याने उपवनसंरक्षक अहिल्यानगर धर्मवीर सालविठ्ठल साहेब (IFS) यांच्या मार्गशनाखाली सहा. वनसंरक्षक, राहुरी गणेश मिसाळ व वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन मारूती शेळके, वनपाल प्रविण उबाळे, वनरक्षक शांतीनाथ सपकाळ, रवि राठोड, नागेश तेलंगे,वनमजुर राघु सुरवसे, शिवाजी चिलघर यांनी कारवाई केली.
 
जवळके ता. जामखेड या ठिकाणी सदर घटनेची खात्री करण्यासाठी बनावट गि-हाईक पाठवुन खातर जमा करण्यात आले सदर ठिकाणी काका वर्धमान वाळुंजकर चंदन तस्करी करत असल्याचे खात्री झाली. सदर ठिकाणी आरोपीसह ३५ गोण्या ढलप्या / सालपट, चंदना च्या गाभ्याचा १ तुकडा (वजन १.४ किलो), वाकास – ३, तराजु – १, विवो कंपनीचा मोबाईल व बजाज कंपनीची. मोटारसायकल असा मुद्येमाल ताब्यात घेतला आहे.
 
सदर प्रकरणी राऊंड गुन्हा क्र. ओ – ०४ / सन २०२४-२५भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२,५१,५२,६९ व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ नियम क्र.३१,५५ अन्वये गुन्हा नोंद केला असून सदर आरोपीस मा. ज्युडिशियल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग – १ जामखेड ता-जामखेड यांच्या न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीला २ दिवसांची वनकस्टडी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार