सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज माझे नाव दुसरेच काहीतरी असते; राज्‍यपाल सी.पी. राधाकृष्‍णन् यांचे प्रतिपादन

१७ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी विद्यापिठाच्‍या दीक्षांत समारंभात बोलतांना त्यांनी वक्तव्य केले आहे.

Sudarshan MH
  • Jan 18 2025 8:48AM

कोल्हापूर: कोल्हापूर विद्यापिठाला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि विद्यापीठ परिसरात स्‍थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्‍कृष्‍ट पुतळा त्‍यांच्‍या शौर्यपूर्ण जीवनाची आठवण करून देतो. मी फक्‍त ६ वर्षांचा असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जीवनाविषयी शिकलो. छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज माझे नाव दुसरेच काहीतरी असते. मी सी.पी. राधाकृष्‍णन् म्‍हणून येथे नसतो, असे वक्‍तव्‍य मा. राज्‍यपाल तथा शिवाजी विद्यापिठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्‍णन् यांनी १७ जानेवारी या दिवशी येथील शिवाजी विद्यापिठाच्‍या दीक्षांत समारंभात बोलतांना केले आहे.

 
राज्‍यपाल म्‍हणाले, की कोल्‍हापूर ही श्री महालक्ष्मी अंबाबाईची पवित्र भूमी आहे. शिवाजी विद्यापिठाच्‍या ६१ व्‍या वार्षिक दीक्षांत समारंभात तुमच्‍यासोबत उपस्‍थित रहातांना मला पुष्‍कळ आनंद होत आहे. आजच्‍या दीक्षांत समारंभात पदवी प्राप्‍त करणार्‍या सर्व पदवीधर विद्यार्थ्‍यांचे मी अभिनंदन करतो. राष्‍ट्रपती सुवर्णपदक, कुलपती सुवर्णपदक आणि पीएच्.डी. मिळालेल्‍या विद्यार्थ्‍यांचे मी विशेषतः अभिनंदन करतो. कोल्‍हापूर ही महान शासक छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे, जे देशभरात शिक्षणाला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी, विशेषतः सामाजिक-आर्थिकदृष्‍ट्या मागासलेल्‍या समुदायांमध्‍ये प्रगतीशील धोरणांसाठी ओळखले जातात.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार