20 टक्के अपघात कमी करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला यश : नितीन गडकरी जागतिक बँकेची रस्ते सुरक्षेवरील
देशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला 20 टक्के रस्त्यांवरील अपघात कमी करण्यात यश आले असून 5 टक्के मृत्यूदरही नियंत्रण आणण्यात आला आहे. अपघात आणि मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
देशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला 20 टक्के रस्त्यांवरील अपघात कमी करण्यात यश आले असून 5 टक्के मृत्यूदरही नियंत्रण आणण्यात आला आहे. अपघात आणि मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
जागतिक बँकेतर्फे रस्ते सुरक्षा निरीक्षण या विषयावर एका परिषदेत ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- देशात 11 टक्के रस्ते अपघात होत असून अपघातांमुळे 3.15 टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे नुकसान होत आहे. रस्ते अपघात आणि अपघात होणार्या मृत्यूचा दर कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हा विभाग करीत असून यासाठी कायद्यातही बदल करण्यात आले आहेत. तसेच आवश्यक तेथे कठोर कारवाईही करण्यात येते. रस्ते सुरक्षा समिती आणि अपघात स्थळांची शोध मोहीम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने हाती घेतली आहे. रस्ते अपघात होऊ नयेत, यासाठी शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. यामुळे जनजागृती निर्माण होऊन अपघातांचे आणि अपघात मृत्यूचे प्रमाण बर्याचअंशी कमी झाले आहे.
तामिळनाडू राज्याने जागतिक बँकेच्या आर्थिक सहकार्याने विविध उपाययोजना करून 25 टक्के अपघातांवर नियंत्रण मिळविले असून 25 टक्के मृत्यू दर कमी करण्यात यश मिळवले आहे. तामिळनाडूने केलेल्या उपाययोजना अन्य राज्य सरकारांनी केल्या तर अपघात आणि अपघातातील मृत्यूचा दर कमी होऊ शकतो, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग आणि शहरातील मार्ग या रस्त्यावरील अपघातस्थळांचे निर्मूलन करण्याची मोहीम सुरु आहे. आतापर्यंत अपघातस्थळे निर्मूलनासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून लोकांचे जीवन आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून अपघात रोखण्याच्या उपाययोजना यशस्वी राबविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गंभीर आहे, असेही ते म्हणाले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प