चर्मकार समाजातील गुणवंतांचा ना. गडकरी यांच्या हस्ते सत्कार
चर्मकार समाजातील गुणवंतांचा
ना. गडकरी यांच्या हस्ते सत्कार
तरुणांनी उद्योग क्षेत्राकडे वळावे : ना. गडकरी
चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च विद्याविभूषित होऊन डॉक्टर, इंजिनीअर, सीए यासारखे मोठे व्हावे आणि समाजाचा विकास करावा. यासोबत तरुणांनी उद्योग क्षेत्राकडे वळावे व आत्मनिर्भर व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
चर्मकार सेवा संघाच्या वतीने आयोजित समाजातील दहावी-बारावीतील गुणवंतांचा सत्कार ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते ना. गडकरी यांच्या निवासस्थानी करण्यात आला. याप्रसंगी आ. प्रवीण दटके, संघटनेचे अध्यक्ष भैयासाहेब बिघाने, कार्याध्यक्ष पंजाबराव सोनेकर, उपमहासचिव डॉ. अशोकराव थोटे, केशवराव सोनेकर, कैलास चंदनकर, प्रशांत काकडे, विजयराव चवरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना. गडकरी पुढे म्हणाले- समाजातील तरुणांनी स्वत:च्या उद्योगाकडे वळावे. एमएसएमई हा विभाग माझ्याकडेच असून त्यासाठी योग्य ती मदत करण्यास तयार आहे. उद्योजक बनल्यामुळे समाज आत्मनिर्भर होईल. यावेळी 200 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पुढील वर्षी गुणवत्ता यादीत प्रथम येणार्या चर्मकार समाजाच्या दहावी-बारावीतील विद्यार्थ्याला प्रत्येकी 51 हजार रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणाही याप्रसंगी ना. गडकरी यांनी केली.
गेल्या 2008 पासून गुणवंतांच्या सत्काराचा कार्यक्रम सुरु असून चर्मकार समाजातील दहावी बारावीत 65 टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणार्या विद्यार्थ्याला एक हजार रुपये तर 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणार्याला 1500 रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे पालक व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प