सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केंद्राकडे १५ जातींचा ओबीसीत समावेश करण्याची शिफारस

राज्य सरकारकडून इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसींच्या यादीत नव्या जाती समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Oct 9 2024 11:33PM

मुंबई: सद्यस्थितीत राज्य सरकारकडे राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा कसा काढायचा? हा प्रश्न आहे. मराठा समाजाला राज्य सरकारने १० टक्के आरक्षण लागू केलं आहे. मात्र, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं असल्याचं मराठा समाज बांधवांचे म्हणणे आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आंदोलन व मागणी अद्यापही सुरू आहे. त्यातच, आता विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकींचा धडाका लावला असून महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

महाराष्ट्रातील १५ जातींची ओबीसींमध्ये समावेश करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसींच्या यादीत नव्या जाती समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने शिफारस केलेल्या जातींचा समावेश ओबीसीमध्ये करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती आहे.

जातींची यादी...

बडगुजर 

सूर्यवंशी गुजर 

लेवे गुजर 

रेवे गुजर 

रेवा गुजर 

पोवार, भोयार, पवार 

कपेवार 

मुन्नार कपेवार 

मुन्नार कापू 

तेलंगा 

तेलंगी 

पेंताररेड्डी

रुकेकरी 

लोध लोधा लोधी 

डांगरी

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें