सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रेल्वे इंजिन जाणार? मनसेला प्रादेशिक पक्षाची मान्यताही नसणार? जाणून घेऊया निवडणूक आयोगाचे नियम...

विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 'अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच...' असे ट्वीट केले.

Sudarshan MH
  • Nov 27 2024 9:42AM

मुंबई: यंदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ पैकी १२५ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले. मात्र त्यांना एकाही जागेवर यश मिळालं नाही. माहीम विधानसभा मतदारसंघातून त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांचाही पराभव झाला आहे. मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांचाही कल्याण ग्रामीण मतदारसंघातून पराभव झाला. आता निवडणूक आयोग त्यांच्या पक्षाची मान्यता आणि निवडणूक चिन्हही गोठवू शकते, अशी माहिती सध्या दिली जात आहे. त्यामुळे हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो आहे.

निवडणूक आयोगाने एखाद्याला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याचे आणि त्यासाठी निवडणूक चिन्ह राखून ठेवण्याचे काही निकष आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, एखाद्या पक्षाचा आमदार निवडून आला आणि त्याला एकूण मतांपैकी ८% मते मिळाली, तर त्याची ओळख कायम राहते. जर दोन आमदार निवडून आले आणि त्यांना एकूण मतांच्या ६% मते मिळाली, जर तीन आमदारांना एकूण मतांच्या ३% मते मिळाली, तरच निवडणूक आयोगाच्या अटी पूर्ण होतात आणि पक्षाची मान्यता कायम राहते.

दरम्यान, निवडणूक आयोगाचे नियम, अटींची पूर्तता न केल्यास, मान्यता रद्द केली जाऊ शकते. या निवडणुकीत मनसेला केवळ १.८% मते मिळाली असून, एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोग त्यांना नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

मनसेने विधानसभेच्या १२८ जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यापैकी एकही जागा जिंकू शकली नाही. मनसेला रेल्वे इंजिन निवडणूक चिन्हही मिळणार नाही. त्यांना पुढील निवडणुकीत मोकळे असणाऱ्या निवडणूक चिन्हांपैकी एक निवडावा लागेल, पण त्यामुळे पक्षाच्या नावावर परिणाम होणार नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार