मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, पण यामध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला होता. यानंतर नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता संभाव्य खातेवाटपाची माहिती समोर आली आहे.
महायुतीचे खातेवाटप ठरल्याची माहिती येत आहे. येत्या २४ तासांत महायुतीच्या खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. शिवसेना यादीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची यादी उद्या दिली जाणार आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या दोन दिवसांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना संपूर्ण खातेवाटपाची यादी देणार आहे.