सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कापसाच्या झाल्या वाती आणि सोयाबीनची माती - अंबादास दानवे

सौर कृषी पंपांकरिता मुख्यमंत्री आणि कुसूम योजना आहेत. त्याच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी देखील भरीव प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी सिंचनासाठी वीज उपलब्धतेकरिता आजही अंधारातच चाचपडत आहे, अशी टीकाही अंबादास दानवे यांनी केली.

Sudarshan MH
  • Dec 18 2024 8:43AM

नागपूर: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी अंबादास दानवे यांनी मंगळवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करतांना, त्यांचे मुद्दे खोडून काढत त्या भाषणाची चांगलीच चिरफाड केली. राज्यपालांनी भाषणातून गुलाबी स्वप्न रंगविण्याचे काम कागदावरील भाषणातून केली आहे, अशी टीका श्री. दानवे यांनी केली.

अंबादास दानवे म्हणाले, की राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादकांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. कापसाच्या केवळ वाती झाल्या असून सोयाबीनची माती उरली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रामकृष्ण उपसा सिंचन योजनेबाबत भूमिका सरकारने घेतली, परंतु यापूर्वी नियोजन व सरकारच्या असहकार्याअभावी अनेक उपसा सिंचन योजना बंद पडल्या आहेत. त्यावर देखील राज्यपालांनी लक्ष वेधणे गरजेचे होते. वैनगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी दिली खरी, मात्र पुढे काहीच करण्यात आले नाही. गेल्या दहा वर्षांत विदर्भ, मराठवाड्यात एकही मोठा प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा गवगवा केला जातो, परंतु त्यातूनही विदर्भ, मराठवाड्याच्या वाट्याला काहीच आले नाही.

सौर कृषी पंपांकरिता मुख्यमंत्री आणि कुसूम योजना आहेत. त्याच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी देखील भरीव प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी सिंचनासाठी वीज उपलब्धतेकरिता आजही अंधारातच चाचपडत आहे, अशी टीकाही अंबादास दानवे यांनी केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार