सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नौदलात एकाच दिवशी आधुनिक सुविधांसह सुसज्‍ज असणाऱ्या ‘निलगिरी’, ‘सुरत’ आणि ‘वागशीर’ या ३ युद्धनौकांचा समावेश

१५ जानेवारी या दिवशी नेव्‍हल डॉकयार्ड, मुंबई येथे एका कार्यक्रमाद्वारे हे देशार्पण पार पडणार आहे.

Sudarshan MH
  • Jan 3 2025 10:34AM

मुंबई: नौदलाच्‍या पश्‍चिम विभागाकडून एकाच दिवशी ‘निलगिरी’, ‘सुरत’ आणि ‘वागशीर’ या ३ युद्धनौकांचा सहभाग होणार आहे. ‘निलगिरी’ हे ‘प्रोजेक्‍ट १७ ए स्‍टेल्‍थ फ्रिगेट’ अर्थात् विनाशिका श्रेणीतील प्रमुख जहाज, ‘सुरत’ हे ‘प्रोजेक्‍ट १५ बी स्‍टेल्‍थ विनाशिका’ श्रेणीतील चौथे जहाज, तर ‘वाघशीर’ ही ‘स्‍कॉर्पिन-श्रेणी प्रकल्‍पा’ची सहावी आणि अंतिम पाणबुडी नौदलात रुजू करून घेण्‍यात येणार आहे.

१५ जानेवारी या दिवशी नेव्‍हल डॉकयार्ड, मुंबई येथे एका कार्यक्रमाद्वारे हे देशार्पण पार पडणार आहे. तीनही युद्धनौकांची बांधणी मुंबईतील ‘माझगाव डॉक शिप बिल्‍डर्स’ या आस्‍थापनात करण्‍यात आली आहे. आधुनिक विमान वाहतूक सुविधांसह सुसज्‍ज निलगिरी आणि सूरतमध्‍ये चेतक, ए.एल्.एच्., सी किंग आणि नव्‍याने समाविष्‍ट करण्‍यात आलेल्‍या MH-60R यांसह अनेक हेलिकॉप्‍टरचा समावेश असून हे हेलिकॉप्‍टर दिवसा आणि रात्री दोन्‍ही वेळा चालणार्‍या मोहिमांमध्‍ये सहभागी होऊ शकते. या जहाजांमध्‍ये महिला अधिकारी आणि महिला खलाशी यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्‍यासाठी विशिष्‍ट निवासस्‍थानांचाही समावेश केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार