सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरूच; सारथी संस्थेसाठी भरीव योगदान दिलेले अशोक काकडे सांगलीचे नवे जिल्हाधिकारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्या सुरू असल्याचे दिसते आहे.

Sudarshan MH
  • Feb 12 2025 4:38PM

सांगली: नवीन सरकार आल्यानंतर सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. नवीन वर्षात देखील हे बदल्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यात जवळपास ३० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा राज्यातील ४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे येथे सारथीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असणारे अशोक काकडे यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची नवी मुंबई येथील सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे. डॉ. दयानिधी यांनी अडीच वर्षे सांगली जिल्ह्यात काम केले. अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी मंगळवारी दुपारी बदलीचे आदेश काढले.

नव्या सरकारने सत्तेत आल्यानंतर प्रशासनात फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सातत्याने केल्या जात आहेत. तर काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देखील देण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्या सुरू असल्याचे दिसते आहे.

अशोक काकडे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील किकवी (ता. भोर) येथील असून, ते २०१० च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून निवड झाल्यानंतर त्यांनी यापूर्वी सांगलीचे निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण आयुक्त, पुणे येथे म्हाडाचे संचालक आणि पुणे येथे सारथीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. काकडे यांनी सांगलीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून २००३ ते २००६ मध्ये काम केले आहे. सांगली जिल्ह्यात यापूर्वी काम केल्याने आपणाला जिल्ह्याची संपूर्ण माहिती आहे. लवकरच आपण पदभार स्वीकारू, असे त्यांनी सांगितले.

अशोक काकडे हे भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) कार्यरत एक वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केले आहे. मार्च २०२० मध्ये त्यांची छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मनुष्यबळ विकास संस्थेच्या (सारथी) व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. आणि आता त्यांची सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनातील त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे, त्यांनी विविध पदांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

नूतन जिल्हाधिकारी काकडे हे सांगली जिल्ह्यात २००३ ते २००६ या कालावधीत निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी सांगलीत पहिला महापूर आला होता. ८ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऑफिस च्या आवारात पाणी होते त्यांनी या आपत्तीचा सामना कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांसह मोठ्या हिमतीने केला होता. व सर्व तालुक्यातही कुशलपणे मॉनेटरिंग करून सर्व जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणली होती. शासनाकडून व विविध संस्थाकडून त्यावेळी प्रचंड प्रमाणात मदत प्राप्त होत होती. त्याचे नियोजनबद्धरित्या व्यवस्थित वाटप केले होते.

कोणत्या अधिकाऱ्यांची बदली...?

१. साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची बदली एमआयडीसीचे सहव्यवस्थापक म्हणून करण्यात आली आहे.

२. सांगलीचे जिल्हाधिकारी मंतदा राजा दयानिधी यांची बदली सिडकोच्या सहव्यवस्थापकपदी करण्यात आली आहे.

३. सारथीचे एमडी अशोक काकडे यांची सांगली जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

४. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची भिवंडी निजामपूर मनपा आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार