सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'छावा'द्वारे छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि संपूर्ण टीमचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की 'छावा'द्वारे छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व देशभर पोहोचविण्याचे कार्य झाले आहे.

Sudarshan MH
  • Mar 6 2025 12:19AM

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळातील सदस्यांसह मुंबई येथे चित्रपट 'छावा' च्या खास स्क्रिनिंगला उपस्थित राहून चित्रपट पाहिला. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्वलंत इतिहासावर आधारित असून, विकी कौशल यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि संपूर्ण टीमचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की "'छावा'द्वारे छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व देशभर पोहोचविण्याचे कार्य झाले आहे."

 
या स्क्रिनिंगचे आयोजन मंत्री आदिती तटकरे यांनी केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते.
 
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देते ते म्हणाले की, "इतिहासकारांनी संभाजी महाराजांच्या चरित्रावर अन्याय केला आहे. मात्र, इतिहासाशी प्रतारणा न करता, ऐतिहासिक तत्त्व कायम ठेवत हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचेल."
 
चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, डिस्ट्रिब्युटर, बॅकस्टेज कलाकार आणि पोस्ट - प्रॉडक्शन टीमच्या मेहनतीचे विशेष कौतुक केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार