सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ओळख लपविण्यासाठी तृतीयपंथी म्हणून मुंबईत राहणारे ८ बांगलादेशी अटकेत

पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तृतीयपंथी म्हणून वास्तव्य करणार्‍या ८ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी गोवंडीतून अटक केली आहे.

Sudarshan MH
  • Mar 28 2025 1:52PM
मुंबई: पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तृतीयपंथी बनवून वास्तव्य करणाऱ्या ८ बांगलादेशी नागरिकांना शिवाजीनगर पोलिसांनी गोवंडी परिसरातून अटक केली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हे बांगलादेशी संपूर्ण मुंबईत तृतीयपंथी बनून फिरत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 
गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात गेल्या काही दिवसांत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. येथील रफिक नगर परिसरात काही बांगलादेशी नागरिक तृतीयपंथी बनून राहत असल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सापळा रचून आठ जणांना ताब्यात घेतले आहे. तपासात ते सर्वजण बांगलादेशी असल्याचे उघड झाले. पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईतून वाचण्यासाठी तृतीयपंथी बनून फिरत असल्याचे या बांगलादेशी नागरिकांनी चौकशीत पोलिसांना सांगितले.
 
बैसाखी खान (२४), रिदोय मिया पाखी (२५), मारूफ इकबाल ढाली (१८), शांताकांत ओहीत खान (२०) बर्षा कोबीर खान (२२), अफजल हुसेन (२२), मिझानुर कोलील (२१) आणि शहादत आमिर खान (२०) अशी या आरोपींची नावे असून या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार