मुंबई: गोमांसाने भरलेला टेम्पो नागपाडा येथे आढळल्या प्रकरणी जिहादी रियाज अहमद साकीर अहमद खान आणि परवेझ अहमद साकीर अहमद खान यांना अटक करण्यात आली. टेम्पोचा मालक आणि चालक यांचा शोध पोलीस घेत आहेत. गोमांसाचे वजन साधारणतः २०० किलो होते. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाविषयी तक्रार दाखल करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे मुंबई शहर विभाग मंत्री राजीव चौबे गेले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात बैठक चालू असल्याने चौबे यांनी स्थानकाच्या बाहेर गोतस्करी विरोधात घोषणा दिल्या. त्याचवेळी एका अज्ञाताने ५० ते ६० जणांचा जमाव एकत्र करत गोतस्करीच्या समर्थनार्थ घोषणा देत दगडफेक केली. या प्रकरणी अज्ञातांविरूद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहे.