भांग्रापाणी येथील "त्या कथीत बोगस काम झालेल्या" पाण्याच्या टाकीचे तक्रारीनंतर लगेचच रंगरंगोटी करून बोगस काम लपविण्याचा ्. प्रयत्न सुरू असल्याची परिसरात चर्चा. चौकशीची मागणी.
प्रयत्न सुरू असल्याची परिसरात चर्चा. चौकशीची मागणी.
अक्कलकुवा प्रतिनिधी - योगेश्वर बुवा 7057283888
भांग्रापाणी येथील "त्या कथीत बोगस काम झालेल्या" पाण्याच्या टाकीचे तक्रारीनंतर लगेचच रंगरंगोटी करून बोगस काम लपविण्याचा ्. प्रयत्न सुरू असल्याची परिसरात चर्चा.
चौकशीची मागणी.
अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील अतिदुर्गम भागातील भांग्रापाणी येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतंर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून ते तात्काळ थांबवून बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबतची मागणी भांग्रापाणी गटाचे जिल्हा परिषद सदस्य बाजूबाई किरेसिंग वसावे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.त्यातच काल लगेचच घाईघाईने संबंधित पाण्याच्या टाकीची रंगरंगोटी करण्यात आली असून हे काय लपविण्यासाठी सुरू आहे.अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भांग्रापाणी येथे प्र मार्ग क्रमांक एकला लागूनच जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे .सदर काम अत्यंत बोगस व निकृष्टरित्या केले जात असून बांधकामात कुठली ही गुणवत्ता अथवा दर्जा दिसून येत नाही .सदर पाणीपुरवठा योजनेचे काम हे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत असल्याचे व कामाचे अंदाजपत्रकीय रक्कम एक कोटी 53 लाख 16 हजार 372 असल्याचे समजते. तरीही ठेकेदाराने टाकीचे बांधकाम थातूरमातूर करून पुढे रेटले आहे. सदर कामावर देखरेख करणारे टेक्निकल माणसे देखील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिले होते किंवा कसे? हा प्रश्न सर्वसामान्य जनता करीत आहे . ठेकेदाराने केलेल्या बोगस बांधकामात केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून भांगरापाणी येथील पाणीपुरवठा योजनेच्या टाकीच्या बांधकामाची संपूर्ण चौकशी करावी व ठेकेदाराने केलेले काम पाडून टाकीचे चांगले बांधकाम करीत नाही तो पर्यत बिलाची रक्कम अदा करू नये आणि बोगस कामात संगनमत करणाऱ्या व ठेकेदाराची पाठ राखण करणाऱ्या अधिकाऱ्यावरही कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा बोगस काम करणाऱ्या यंत्रणेविरुद्ध कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येईल.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प