नाशिक: मागील आठवड्यात नाशिक शहरातील कार डेकोर व्यावसायिक निखिल दर्यानी ऊर्फ निकू यांचे दोघांनी त्यांच्या कारमध्ये बसून डोक्याला बंदूक लावून अपहरण केले होते. १ कोटीची खंडणी मागून ५० लाखांची तडजोड करत त्यापैकी १५ लाख रुपये घेतले होते. नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट - १ च्या पथकाने या प्रकरणी सखोल तपास करत तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने ४ जिहाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून २ लाख ८८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. टोळीचा म्होरक्या, सराईत गुन्हेगार फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
नाशिक शहरातील एका सिग्नलवर दर्यानी यांनी कार उभी केली होती. त्यावेळी कार जवळ दोघे अनोळखी इसमांनी येऊन चर्चा करायची आहे, असे सांगून एका कारमध्ये बसले. त्यांनी त्यांच्या डोक्याला बंदूक लावून जीवे ठार मारण्याची धमकी देत कार शहराबाहेर घेऊन जाण्यास भाग पाडल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) दुपारच्या वेळेला घडली होती. नाशिकरोड, देवळाली कॅम्प, भगूरमार्गे घोटीवरून भंडारदरारोड आदी भागात त्यांना घेऊन जात जीवे ठार मारण्याची धमकी देत हवेत बंदुकीतून दोन राउंड फायर केले होते. यावेळी शहरात त्यांनी त्यांच्या मोबाइलवरून दर्यानी यांच्या भावाशी संपर्क करून ५० लाखांपैकी १५ लाख रुपये देण्यास सांगितले.
ही रक्कम घेतल्यानंतर संशयितांनी त्यांना पुन्हा शहराच्या वेशीवर पांडवलेणी येथे आणले. तेथे कार बदलण्याचा प्रयत्नात असतांना दर्यानी यांनी तिथून कशीतरी सुटका करत पळ काढला होता. या प्रकरणी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाच्या सूचना केल्या.
पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे आदींच्या पथकाने संशयित आरोपी सराईत गुन्हेगार जिहादी मोहम्मद अन्वर सय्यद (३०, रा. जुने नाशिक), सादिक लतीफ सय्यद (३९, लेखानगर) दर्यानी यांच्या दुकानातील कामगार संशयित अल्फरान अश्पाक शेख (२५, रा. जुने नाशिक), अहमद रहिम शेख (२५, रा. वडाळागाव) यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.