सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निलंगा तालुक्यातील आनंदवाडी { गौर } येथील विवाह सोहळ्यात 40 पाहुण्यांनी केला अवयवदान पञाचा आहेर

मराठवाड्याच्या पटलावर आदर्श विवाह सोहळ्याची चर्चा.पहिलाच उपक्रम लग्नसोहळ्यात अवयव दानाचे पञ सादर करून प्रतिसाद..

S.n.ranjankar
  • Nov 22 2021 3:24PM
निलंगा तालुक्यातील आनंदवाडी { गौर } 635 लोकसंख्येचे गाव आहे.संपूर्ण गावातील शंभर टक्के लोकांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला आहे.माजी सरपंच ज्ञानोबा चामे यांनी आपल्या मुलाच्या लग्न सोहळ्यात भेटवस्तूऐवजी अवयवदान करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार लग्नात आलेल्या 40 वर्‍हाडी मंडळींनी अवयवदान करण्याचे संकल्पपञ रविवारी भरून दिले आहे.माजी सरपंच ज्ञानोबा पंढरी चामे यांनी सामाजिक बांधिलकी राखत कुठल्याही प्रकारचा हुंडा अथवा दागदागिने किंवा कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू न घेता त्यांनी हा विवाह सोहळा पार पाडला.लोकांना व सर्व नातेवाईक,मिञ परिवार या सर्वांना त्यांनी पञिकेच्या माध्यमातून आवाहन केले की आपला आहेर स्विकारला जाईल पण..तो भेटवस्तूंचा नाही तर वधू-वरांना शुभ आशिर्वादासह अवयवदान संकल्पाचा या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळावा व जवळपास 40 लोकांनी अवयवदानाचे संकल्पपञ भरून मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला.या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून लोकापर्यंत विषय गेला,अवयवदानाचे महत्त्व लोकांना समजले.विवाह सोहळ्याच्या माध्यमातून चामे-बडगिरे परिवारांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागात अवयवदानाचा प्रसार व जनजागृृती व्हावी,अन्य लोकांनीसुध्दा या विवाह सोहळ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून याचे अनुकरण करावे,अशी आशा आनंदवाडी { गौर } व फेडरेशनने केली आहे.दोन्ही कुटुंबांनी समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला.या कामी अवयवदान सकल्यपञ भरण्यासाठी अवयवदान व देहदान क्षेञात काम करणारे प्राथमिक शिक्षक राम चवरे यांनी मदत केली व द फेडरेशन आँफ आरगाॅन अँन्ड बाॅडी डोनेशनचे संस्थापक पुरूषोत्तम पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार