पुणे: आज प्रत्येक क्षेत्रात आर्टीफिशीअल इंटेलिजन्सचा वापर वाढला आहे. आपल्या राज्यात कृषी क्षेत्रात एआयचा वापरातून शेती उत्पन्न वाढवण्यााठी मी सहा पिकांची निवड केली आहे. त्यासाठी उस, कापूस, सोयाबीन, भात, कांदा या पिकांसाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. दोन वर्षांसाठी असली तरी पैसे कमी पडले तर आम्ही चर्चा करून अधिकचा निधी देण्याची तयारी आहे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलतांना मांडली आहे. काल सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी सकाळी पुण्यातील साखर संकुलात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, की आपल्याकडे शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना आम्हांला जे फायदे मिळून द्यायचे आहे. त्यात शेती उत्पादनात वाढ, मातीची सुपीकता वाढवणे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच, रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता खराब होते. पण एआयच्या वापरातून खतांची बचत होते, पाण्याची बचत होते. हे सर्व करत असताना ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट कंपन्यांमधील काही लोकांनी आपल्यासोबतच इतर काही संस्थानीही टायअप केलं आहे. राज्यातील जेवढी कृषी विद्यापीठे आणि काही खाजगी कंपन्याही यात उतरल्या आहेत. शेतकऱ्याला हे सर्व देत असतांना पैसे कसे उपलब्ध होणार, याबाबत आम्ही गेल्या दीड तासात चर्चा केली.