सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रचार संपला आता जनतेने आपली सद्सदविवेक बुद्धी वापरून मतदान करावे...तानावडे

प्रगती आणि विकासासाठी भाजपाला निवडून द्या

Snehal Joshi .
  • Feb 12 2022 9:53PM

राज्यातील निवडणुकांचा प्रचार आज संपत आहे. मतदान केवळ एक दिवसांवर येऊन ठेपले आहे. गोमंतकीय जनतेने आपली सद्सदविवेक बुद्धी वापरून मतदान करावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे यांनी केले.

येथील निवडणूक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकल्येकर उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. शेट - तानावडे म्हणाले, गेल्या दोन - तीन महिन्यांपासून राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेते पक्षाचा प्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंदिय मंत्री स्मृती इराणी, निवडून प्रभारी देवेंद्र फडणवीस, उपप्रभारी दर्शना जर्दोष, गोवा प्रभारी सी टी रवी, उपप्रभारी जयकिशन रेड्डी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी, महिला मोर्चा, युवक मोर्चा, बूथ कार्यकर्ते, विविध विभागाचे पदाधिकारी, सदस्य अहोरात्र कष्ट घेत आहेत. पक्षाच्या विजयासाठी राबत असलेल्या या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच आमची प्रत्येक बातमी लोकांपर्यंत पोहोचवणे वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रं प्रतिनिधी यांचेही मी आभार मानतो, अशा शब्दात श्री. शेट - तानावडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आमच्या उमेदवारांनी घरोघरी प्रचार मोहीम राबवली. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून सर्वांनी जोरदार प्रचार केला. भाजपा सरकारने केलेली कामे सर्वांपर्यंत पोहोचवली. तसेच पक्षाने २२ कलमी संकल्प पत्रही लोकांसमोर ठेवले आहे.

भाजपा सरकारने गेल्या दहा वर्षांत राज्याचा आणि राज्याचा केलेला विकास सर्वांसमोर आहे. यासाठी गोमंतकीय जनतेने विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच त्यांच्या खोट्या आश्वासनांकडे लक्ष देऊ नये. राज्याच्या विकासासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी लोकांनी भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. दि. १४ रोजी होणाऱ्या मतदानादिवशी कमळ चिन्हांचे बटण दाबून भाजपाला प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन श्री. शेट - तानावडे यांनी यावेळी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार