सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

काँग्रेसनं मुस्लिम समाजाचा व्होटबँक म्हणून वापर केला - किरण रिजिजू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली 'सबका साथ, सबका विकास' या धोरणांतर्गत या सर्व अल्पसंख्याक समुदायांचा विकास करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले.

Sudarshan MH
  • Oct 14 2024 2:07PM

छत्रपती संभाजीनगर: केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी, १३ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर तेथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी "काँग्रेसनं अल्पसंख्याक मंत्रालयानं मुस्लिम समाजाला फक्त व्होट बँकेसाठी वापरलं", असा आरोप रिजिजू यांनी केला. तसंच काँग्रेसनं मुस्लिम अफेयर्स मंत्रालयाची स्थापना करून राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदी मुस्लिम व्यक्तीच असावी, असा नियम घालून इतर अल्पसंख्यांक समुदायांवर अन्याय केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समानतेच्या तत्त्वांना काँग्रेसनं फाटा दिला आणि यामुळं मुस्लिम समाजाचं खरं नुकसान झालं असल्याचं ते म्हणाले.

 
काँग्रेसनं आंबेडकरांचा तिरस्कार केला : काँग्रेसवर टीका करताना किरेन रिजिजू म्हणाले, "काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमीच तिरस्कार केला. जवाहरलाल नेहरू यांना काँग्रेसनं स्वत: भारतरत्न दिलं. मात्र, बाबासाहेबांना दिलं नाही. 1990 साली केंद्रातील भाजपाच्या सहकार्यानं स्थापन झालेल्या केंद्र सरकारच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न प्रदान करण्यात आला", असं रिजिजू यांनी सांगितलं. तसंच भारतामधील सहा प्रमुख अल्पसंख्याक समुदायांमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, आणि पारसी यांचा समावेश होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली 'सबका साथ, सबका विकास' या धोरणांतर्गत या सर्व अल्पसंख्याक समुदायांचा विकास करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मुस्लिम समाजाच्या मागासलेल्या घटकांसाठी सरकार नवीन वक्फ कायदा आणत असून भारतातील वक्फ मंडळाकडं जगातील वक्फ मंडळांपेक्षा अधिक संपत्ती, मालमत्ता आहे. हा कायदा या संपत्तीचा योग्य वापर करण्यावर भर देत आहे. वक्फ संपत्तीमुळं गरीब मुस्लिम, विशेषतः महिला आणि विद्यार्थी, यांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल, असा विश्वास रिजिजू यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारनं 2014 पासून संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. 2024 हे संविधानाला 75 वर्षे पूर्ण होण्याचे वर्ष असून, या निमित्तानं देशभरात मोठा उत्सव साजरा केला जाणार आहे. घराघरात संविधान पूजेचा उपक्रमही हाती घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार