सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्कूलबस चालकांचे लातुरात अर्धनग्न आंदोलन

मागील दोन वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे स्कूल बस चालक यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली असताना वाहन कर्जाचे हप्ते मात्र वसूल केले जात असल्याने काल लातूर येथे जिल्हाधिकारी यांना अर्धनग्न अवस्थेत जाऊन लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले

s.ranjankar
  • Sep 29 2021 4:41PM
लातूर: मागील दोन वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे  स्कूल बस चालक यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली असताना वाहन कर्जाचे हप्ते मात्र वसूल केले जात असल्याने काल लातूर येथे जिल्हाधिकारी यांना अर्धनग्न अवस्थेत जाऊन लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले. ज्यांची वाहने ही प्रायव्हेट फायनान्स यांच्या मार्फत घेण्यात आलेली आहेत अशांची हप्ते भरण्याची कुवत नसताना फायनान्स कंपनीचे लोक येऊन अरेरावीची भाषा वापरतात आणि अश्लील शब्दांचा प्रयोग करून गाडी ओढून नेण्याचा धमकी देत असल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे एकतर शाळा चालू करा अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या अशा स्वरूपामध्ये विद्यार्थी वाहतूक संघटनेमार्फत आक्रोश व्यक्त करण्यात आला.
यावेळी निवेदनावर संस्थापक अध्यक्ष  श्रीकृष्ण पाडे, उपाध्यक्ष अनिल शिंदे, सचिव संदीप वाघ, सहसचिव गोविंद धुमाळ, कोषाध्यक्ष सुरेंद्र सरवदे, जिल्हाध्यक्ष विनोद कर केले उपाध्यक्ष दत्ता कानडे कार्याध्यक्ष नंदकुमार उजळंबे शहराध्यक्ष सतीश माकरे यासह सदस्य बोरे संजय अतुल भांगे बालाजी पार गावे सचिन अनिल आहेरे बालाजी स्वामी परमेश्वर नंदकिशोर उजळंबे उमाकांत कांबळे बाबुराव मिरकर बलभीम बनसोडे माधव पोवाळे अहमद शेख हनुमंत बोडके भालेकर निवृत्ती दत्ता कानडे सूर्यकांत जगदाळे रमेश अंधारे पन्हाळे एकनाथ राजाभाऊ गोरे विशाल पवार युवराज मुझे मोहन कस्पटे शंकर सूर्यवंशी दत्ता पठारे या सर्वांच्या साक्षर या निवेदनावर ती असून जिल्हाधिकारी यांनी मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी असे मत श्रीकृष्ण पांडे यांनी व्यक्त केले.
 
 
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार