सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देवघाट नाला याठिकाणी स्थिर पथकाकडून वाहनांची तपासणी

नंदुरबार- नंदुरबार विधानसभा मतदार क्षेत्रात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी चोख व्यवस्था कार्यरत आहे.

Sudarshan MH
  • Nov 12 2024 1:48PM
देवघाट नाला याठिकाणी स्थिर 
पथकाकडून वाहनांची तपासणी 
 
नंदुरबार- नंदुरबार विधानसभा मतदार क्षेत्रात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी चोख व्यवस्था कार्यरत आहे. आयएएस पवन दत्त यांनी शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील देवघाट नाला याठिकाणी स्थिर पथकाने अचानक भेट देऊन स्थिर पथकाच्या कामकाजाची पाहणी केली.
 
विधान सभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत नंदुरबार 
३ (अ.ज.) मतदार संघात मा. निवडणूक आयोग मार्फत दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून मा. भारत निवडणूक आयोग यांचे मार्फत आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती. अंजली शर्मा यांनी नंदुरबार विधानसभा कार्यक्षेत्रात नागरिकांसाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खवरदारी म्हणून नंदुरबार विधान सभा क्षेत्रात ३ ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके आणि ४ फिरते पथके असे एकूण ७ सर्वेक्षण पथके नियुक्त केले आहेत. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी हे ७ पथके २४ तास कार्यरत आहेत. नंदुरबार विधानसभा मतदार संघात आजपर्यंत या पथकांनी केलेल्या कारवाईत एकूण रक्कम रु. ३५.७५.१९०८( रुपये पस्तीस लाख पंचाहत्तर हजार एकशे नव्वद मात्र जप्त करण्यात आलेली आहे. तसेच निवडणूक काळात सभा, मिरवणूक, समारंभ, बॅनर, लावणे, व ईतर कार्यक्रम करण्यासाठी विविध परवानग्या देणेसाठी तहसील कार्यालय नंदुरबार येथे एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आलेला अनून त्याचा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२५६४-२३२२६९ असून यावर नागरिक संपर्क करू शकता. स्थिर सर्वेक्षण पथके, भरारी पथके, व्ही. डी, ओ. सर्वेक्षण पथके आणि व्ही.डी, ओ पाहणी पथके तसेच आचार संहिता कक्ष यांच्या मार्फत नंदुरबार विधानसभा कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी २४ तास यंत्रणा कार्य करीत अमून जिल्हा स्तरावरील बरिष्ठ निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकारी मातत्याने या सर्वांवर भेटी देऊन नियंत्रण ठेवीत आहेत. सर्व सामान्य नागरिक, मतदार हे आदर्श आचार मंहीताचे उल्लंघनवावत आपली तक्रार सी विजील अॅसवर भेट नोंदवू शकता. तमेच निवडणूक संदर्भातील तक्रार आणि इतर माहिती माठी आयोगाचे टोल फ्री क्रमांक 1800-11-1950 यावर देखील नागरिकांनी संपर्क करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार