सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या-चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच व मराठा चळवळीतील कार्यकर्ता संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची भर दिवसा निर्घृण हत्या करण्यात आली असून ही लोकशाही ची हत्या आहे.

Rohit Patil
  • Dec 13 2024 8:11PM
मस्साजोग गावाच्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या-चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी 
 
 बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच व मराठा चळवळीतील कार्यकर्ता संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची भर दिवसा निर्घृण हत्या करण्यात आली असून ही लोकशाही ची हत्या आहे. ज्या आरोपींनी निरपराध सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्या आरोपीना स्थानिक राजकीय नेत्यांचे अभय असल्याने अशा जातीवादी राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.तसेच मस्साजोग गावाच्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने दि १३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार चाळीसगाव द्वारा मागणी करण्यात आली आहे,
      समाजाला घातक असलेल्या अशा गुन्हेगारांवर कठोरातील कठोर कारवाई करून आरोपींना फाशी ची शिक्षा व्हावी.या घडनेला जबाबदार असणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी,तसेच बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने मराठा समाजावर अन्याय, अत्याचार,हल्ले घडवून आणले जात आहे.अशा समाज विघातक जातीयवादी नेत्यांचा बंदोबस्त मराठा समाज लवकरच करेल.तसेच बीड जिल्ह्यातील केज येथील लोकांमध्ये चर्चा आहे की बीड चे माजी पालकमंत्री या घडणेचा मास्टर माईंड असून त्याची देखील चौकशी होणे गरजेची आहे,या संबधीतांचे मोबाईल लोकेशन सी.डी.आर.काढून योग्य ती चौकशी करून कारवाई व्हावी.मराठा चळवळीतील लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देवून महाराष्ट्र सरकारने संपूर्ण मराठा समाजाला न्याय द्यावा‌.अन्यथा लोकशाही व प्रशासनावरचा विश्वास जनतेचा उडाल्याशिवाय राहणार नाही.तसेच संतोष देशमुख यांच्या खुनाचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून संतोष देशमुख यांच्या कुंटुबाला आणि मराठा समाजाला न्याय द्यावा. अन्यथा राज्यभर मराठा समाज रस्त्यावर उतरून राज्य सरकारला त्याची जागा दाखविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. समाजाला घातक असलेल्या अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याची मागणी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार प्रशात पाटील द्वारा मागणी करण्यात आली आहे, तसेच चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने हत्याचा निषेध करण्यात आला आहे, निवेदनावर गणेश पवार, दिलीप पाटील, अरुण पाटील, खुशाल बिडे ,पी एन पाटील, विलास पाटील, दिलीप बिराजदार ,योगेश पाटील मुकुंद पवार, भरत नवले ,दीपक देशमुख ,कैलास पाटील, योगेश पाटील, रवींद्र गायकवाड,कुणाल पाटील, सुनील चव्हाण, आर बी जगताप, डॉ अजय पाटील, अशोक भोसले ,दिलीप पवार ,अमोल पवार,विजय पवार, आनंदा पवार,नाना नवले,नाना कापसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

प्रतिनिधी : सुनील पाटील . 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार