नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एनडीए आणि 'इंडिया' आघाडीच्या खासदारात मोठी धक्काबुक्की झाली. यावेळी राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या धक्काबुक्कीत भाजपाचे दोन खासदार जखमी झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आधी पोलीस या गुन्ह्याचा तपास करत होते. मात्र आता दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.