MahaKumbh 2025 Special Train: प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. रोज कोट्यवधी भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी जातात. दरम्यान, महाकुंभमेळ्यासाठी जाण्यासाठी विशेष हुबळी ते वाराणसी अशा सहा रेल्वे फेऱ्या होणार आहेत. ही रेल्वे पुण्यासह सातारा, दौंड, मिरज, सांगली,अहिल्यानगर येथून धावणार आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना प्रयागराजला जाण्यासाठी विशेष गाडी उपलब्ध झाली आहे.
कुंभमेळ्याला प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हुबळी - वाराणसी विशेष रेल्वे धावणार आहे. त्यामध्ये रेल्वे क्रमांक ०७३८३ ही विशेष रेल्वे गाडी १४, २१ आणि २८ रोजी हुबळी येथून सकाळी आठ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता वाराणसी येथे पोहचेल. रेल्वे क्रमांक ०७३८४ ही विशेष गाडी १७ आणि २४ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी वाराणसी येथून सकाळी पाच वाजता सुटेल व हुबळी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी पोहचेल.
या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ११ शयनयान, १ सामान्य द्वितीय सिटिंग असलेली गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार असेल. ही ट्रेन मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड आणि भुसावळ मार्गे धावणार आहे.