श्रीनगर: जम्मू - काश्मीरमधील पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी हा हल्ला धर्माच्या आधारावर करण्यात आल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेने घेतल्याचे म्हटले जात आहे. पोलिस युनिफॉर्ममध्ये आलेल्या दहशतवाद्यांनी तिथे बसलेल्या पर्यटकांना त्यांची नावे विचारली. ते पर्यटक मुस्लिम नसल्याचे समजताच त्यांनी गोळीबार सुरू केला.
बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. जम्मू - काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांनी सांगितले, की दहशतवाद्यांच्या एका गटाने मॅगी खाणाऱ्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. पर्यटकांना त्यांची नावे विचारून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
दरम्यान या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. हा हल्ला होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने जम्मू - काश्मीरला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार केला.