सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अमरावतीत हिंसाचारानंतर ४ दिवसांसाठी कर्फ्यू

अमरावतीत कर्फ्यू लागू झाल्यानं अनेक निर्बंध लागू करण्यात आलेत. यामुळे शहरात काय सुरू राहणार आणि काय बंद याविषयीचा हा खास आढावा.

Sudarshan MH
  • Nov 14 2021 11:43AM

महाराष्ट्रातील अमरावती शहरात हिंसाचारानंतर प्रशासनाने ४ दिवसांसाठी कर्फ्यू लागू केला आहे. अफवा पसरवण्यावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील इंटरनेट सेवा देखील खंडीत करण्यात आलीय. इंटरनेटवरील निर्बंध ३ दिवसांसाठी असणार आहे. एकूणच अमरावतीत कर्फ्यू लागू झाल्यानं अनेक निर्बंध लागू करण्यात आलेत. यामुळे शहरात काय सुरू राहणार आणि काय बंद याविषयीचा हा खास आढावा.

१२ आणि १३ नोव्हेंबरला झालेल्या हिंसक घटनांनंतर पोलीस आयुक्त संदिप पाटील यांनी शहरात कलम १४४ लागू करत कर्फ्यूचे आदेश दिलेत. यानुसार आरोग्यविषयक आणीबाणी वगळता नागरिकांना घरााबाहेर पडता येणार नाही. ५ किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यावरही निर्बंध आहेत. हे सर्व निर्बंध कर्फ्यूबाबतचा पुढील आदेश येईपर्यंत लागू असतील

त्रिपुरात अल्पसंख्यांक समाजावर झालेल्या हल्ल्यांविरोधात अमरावतीत १२ नोव्हेंबरला निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुस्लीम संघटनांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत हे हल्ले रोखण्याची मागणी करण्यात आली. यानंतर मोर्चातील लोक परत जात असतानाच अमरावतीतील चित्रा चौक, कॉटन बाजार परिसरात ३ ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.

या विरोधात भाजपाने १३ नोव्हेंबरला अमरावती बंदची हाक दिली. मात्र, या बंदला हिंसक वळण लागलं. जमावाने अनेक दुकानांची तोडफोड करत मोठं नुकसान केलं. यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झालं. यामुळे अखेर अमरावती प्रशासनाने कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. अमरावतीसह नांदेड, मालेगाव, वाशिम आणि यवतमाळमध्ये दगडफेकीचे प्रकार घडले. या प्रकरणात आतापर्यंत २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अनेक जणांना अटक करण्यात

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार