चाकण: महाराष्ट्राच्या मातीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना चाकणमधील शेलपिंपळ गावात घडली आहे. येथे एका निष्पाप १६ वर्षीय हिंदू अल्पवयीन मुलीवर जिहादी आसिम मुलाणी (वय - २६ वर्ष) याने दीर्घ काळ लज्जास्पद अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना 'लव जिहाद'चा घृणास्पद प्रकार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, नराधम आरोपी आसिम मुलाणी(वय-२६ वर्षे) रा. शेलपिंपलगाव, ता. खेड, जि. पुणे याने पीडित अल्पवयीन मुलीवर १६ डिसेंबर २०२४ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत वारंवार अत्याचार केला आहे. त्याच अनुषंगाने आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेवून वेळोवेळी सायंकाळी बोलावून घेवून तिच्या इच्छेविरुद्ध जबदस्तीने शरीर संबंध ठेवून झालेला प्रकार कुणाला सांगितला तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली होती. २६ एप्रिलला पीडित मुलीचा वाढदिवस साजरा करतो असे म्हणून तिला आबासाहेब हॉटेलमध्ये बोलावून घेवून तेथेही नराधम आरोपीने तिच्या इच्छे विरुद्ध जबरदस्ती शरीर संबंध ठेऊन तिच्यावर अत्याचार केला.
पीडित मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी शेलपिंपळगावात पसरताच गावातील तरुणांनी आरोपीस चांगलाच चोप दिला. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच वेळीच चाकण पोलिसांनी हस्तक्षेप करून आरोपीस ताब्यात घेवून अटक केली. या अगोदर याच महिन्यात खेड तालुक्यातील मांजरेवाडी गावात एका नराधमाणे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा क्रूरपणे खून केला होता. त्या मुलीच्या घटनेला अजून महिनाही उलटला नाही तोच पुन्हा खेड तालुक्यात अत्याचारांची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून शेलपिंपळगावात चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी भेट देऊन ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आव्हान करून आरोपीला कडक शासन करण्याचे आश्वासन दिले.
घटनास्थळाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपआयुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिह गौर यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेवून ग्रामस्थांना शांततेचे आव्हान केले आहे. ग्रामस्थांनी आरोपीला कडक शासन करण्याची मागणी केली आहे. गावात कोणतीही घटना घडू नये यासाठी चाकण पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एम), पोस्को कलम ४, ५(२)(एल), ६, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम या करत आहेत
"ही फक्त एक घटना नाही, हा हिंदू मुलींच्या अस्तित्वावर होणारा संगठित हल्ला आहे!" अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांन कडून लव जिहादविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी राज्य सरकार कडे करण्यात आली आहे.
-