सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ऑडिओ व्हिडीओ CCTV कॅमेरे तुरुंगात अनिवार्य, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश...

तुरुंगात चौकशीच्या ठिकाणी ऑडिओ रेकॉर्डिंगसहीत सीसीटीव्ही लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.  सीबीआय, एनआयए, अंमलबजावणी संचालनालय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, डायरेक्टरेट ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्स आणि सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफीस  यांच्या कार्यालयात आणि चौकशी केल्या जाणाऱ्या सगळ्या बंद खोलींत ऑडिओ रेकॉर्डिंग तसंच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश

Snehal Joshi .
  • Dec 3 2020 10:57PM
देशभरातील चौकशी यंत्रणा आणि पोलिसांसाठी सर्वोच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वपूर्ण असे निर्देश दिले आहेत. तुरुंगात चौकशीच्या ठिकाणी ऑडिओ रेकॉर्डिंगसहीत सीसीटीव्ही लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.  सीबीआय, एनआयए, अंमलबजावणी संचालनालय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, डायरेक्टरेट ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्स आणि सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफीस  यांच्या कार्यालयात आणि चौकशी केल्या जाणाऱ्या सगळ्या बंद खोलींत ऑडिओ रेकॉर्डिंग तसंच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. यासोबतच सर्व राज्यांच्या पोलीस स्टेशनमध्येही ऑडिओ रेकॉर्डिंगसोबतच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  पोलीस स्टेशनचं प्रवेश आणि निर्गमन द्वार, लॉक अप, कॉरिडोर, लॉबी एरिया, रिसेप्शन एरिया, सब इन्स्पेक्टर आणि इस्पेक्टर यांचे रुम, स्टेशनच्या बाहरेचा परिसर, वॉशरुमच्या बाहेरचा भाग इत्यादी भागांतही कॅमेरे लावण्यात यावेत, असंही कोर्टानं स्पष्ट केले आहे.   प्रत्येक ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग पुढच्या १८ महिन्यांपर्यंत उपलब्ध असायला हवं, असंही कोर्टानं म्हटलंय. यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आदेशही जारी केलेत. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार