सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत - बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामने रहित करा; हिंदू जनजागृती समितीची ‘बीसीसीआय’कडे मागणी

या निवेदनाची प्रत देशाचे पंतप्रधान, केंद्रीय क्रीडामंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांनाही देण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Sep 18 2024 9:36AM

मुंबई: बांगलादेशात आजही हिंदूंवर अत्याचार चालू आहे. तरीही बांगलादेश आणि भारत यांच्यात क्रिकेटचे सामने आयोजित करणे, हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे. जोपर्यंत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत - बांगलादेश यांच्यातील सर्व क्रिकेट सामने आणि बांगलादेशी कलाकारांचे सर्व कार्यक्रम रहित करण्यात यावेत, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’कडे केली आहे. याविषयीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने बीसीसीआयच्या मुंबईतील विशेष कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनाची प्रत देशाचे पंतप्रधान, केंद्रीय क्रीडामंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांनाही देण्यात आली आहे.

 
या वेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशसमवेत भारताचे क्रिकेटचे दोन कसोटी सामने आणि तीन टी-२० सामने १९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत भारतात आयोजित करण्यात आले आहेत. हे क्रिकेट सामने चेन्नई, कानपूर, ग्वाल्हेर, देहली आणि भाग्यनगर (हैदराबाद) येथे होणार आहेत. दुसरीकडे बांगलादेशातील हिंदु समाजावर सातत्याने आक्रमणे चालू आहेत. आतापर्यंत २३० लोकांचा मृत्यू झाला असून बांगलादेशातील ६४ जिल्ह्यांपैकी ५२ जिल्ह्यांमध्ये हिंदुविरोधी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागात हिंसाचार अधिक आहे. तिथे हिंदु समुदाय असुरक्षिततेच्या वातावरणात जीवन जगत आहे. नुकतीच उत्सव मंडल या तरुण हिंदु युवकाचे कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली जिहादी जमावाने थेट पोलीस ठाण्यात घुसून दोन्ही डोळे काढून चिरडले. अशा प्रकारे बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणे करणे, त्यांच्या निर्घृण हत्या करणे, हे राजरोसपणे चालू आहे.
 
मुसलमान समाजावर होणार्‍या कोणत्याही आघाताला इतर मुसलमान देश तीव्र विरोध करतात, तशीच भूमिका भारताने हिंदूंवरील आक्रमणांच्या विरोधात घ्यावी. बांगलादेशात तेथील धर्मांध जिहादी हे हिंदूंच्या राजरोसपणे हत्या करणार, हिंदूंची घरे जाळणार, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणार, भूमी बळकावणार, हिंदु महिलांवर बलात्कार करणार आणि आम्ही त्यांच्यासमवेत क्रिकेटचे सामने खेळायचे का ? हे आम्ही कदापि सहन करणार नाही, असेही समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार