Danish Kaneria On Pahalgam Attack: पाकिस्तानातील माजी हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. जर खरचं पाकिस्तानचा पहलगाम आतंकवादी आक्रमणात हात नाही, तर मग शाहबाज शरीफ यांनी निषेध का केला नाही? सैन्याला अचानक का सतर्क रहायला सांगितले? असे त्यांनी यासाठी केले; कारण त्यांना सत्याची कल्पना आहे. वास्तव काय आहे? हे त्यांना माहिती आहे.
तसेच, दहशतवाद्यांना शरण देतांना आणि दहशतवादाला प्रोत्साहन देतांना पाकिस्तानला लाज वाटली पाहिजे, असे दानिश कानेरिया यांनी एक्सवर पोस्ट करतांना म्हटले आहे.