देशात अनेक राज्यात आरक्षणावर वेगवेगळे समाज आक्रमक होत आहेत. महाराष्ट्रात मराठा, हरियाणामध्ये जाट, राजस्थानमध्ये गुर्जर समाज आरक्षण मागणीसंदर्भात आक्रमक होत आहे. आरक्षणाची मर्यादा 80% वाढवा अशी मागणी आता जोर धरू राहिली आहे. अशातच जाट, गुर्जर, मराठा, पाटीदार संयुक्त आरक्षण संघर्ष समिती तर्फे मुंबईत पञकार परिषद घेण्यात आली आहे.
या परिषदे साठी जाट समाज नेते युद्धवीरसिंग, अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, शेतकरी नेते राकेश टिकैत तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे, उपाध्यक्ष संतोष नानावटे व इतर मंडळी उपस्थित होते.