बीड: राज्यभरात बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशसंतोष देशमुख हत्या प्रकरणावरून चर्चेत असलेल्या बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.मुख यांचे हत्या प्रकरण ताजे असतांनाच बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. बीडमध्ये आष्टी तालुक्यात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. हत्येमागचे कारण अस्पष्ट आहे. बीड पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामधील वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावाची निर्घृण हत्या करण्यात आली. अजय भोसले (३० वर्षे) आणि भरत भोसले (३२ वर्षे) अशी हत्या झालेल्या सख्ख्या भावांची नावं आहेत. हे दोघे भाऊ बीड-नगर हद्दीवरील आष्टी तालुक्यातील हातवळण या मूळ गावचे रहिवासी होते.
हातवळण गावापासून ५ किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.