Pahalgam Terror Attack: अमेरिका आतंकवादाच्या विरोधात भारता समवेत खंबीरपणे उभी आहे. आम्ही मृतांच्या आत्म्यासाठी आणि घायाळांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. पंतप्रधान मोदी आणि भारतातील लोकांना आमचा पूर्ण पाठिंबा आणि सहानुभूती आहे. आम्ही तुम्हां सर्वांच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा निषेध करतांना व्यक्त केली. ट्रम्प यांच्या प्रमाणेच अनेक देशांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स त्यांच्या कुटुंबासमवेत भारताच्या दौर्यावर आहेत. त्यांनी आक्रमणाविषयी म्हटले की, पत्नी उषा आणि मी भारतातील पहलगाम येथे झालेल्या विनाशकारी दहशतवादी आक्रमणातील मृत्यू झालेल्यांप्रती शोक व्यक्त करतो. गेल्या काही दिवसांपासून या देशाच्या आणि लोकांच्या सौंदर्याने आम्ही भारावून गेलो आहोत. या भयानक आक्रमणाबद्दल शोक व्यक्त करतांना आमचे विचार आणि प्रार्थना त्यांच्यासमवेत आहेत.
आतंकवादामध्ये मृत्यू पावलेल्यांच्या प्रती शोक व्यक्त करतो. आम्हाला अपेक्षा आहे की, या आक्रमणातील गुन्हेगारांना शिक्षा होईल. आतंकवादाच्या सर्व प्रकारांविरुद्धच्या लढाईत आम्ही भारतासमवेत आहोत, असे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी म्हटल्याचं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.