सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गांजाची आधुनिक शेती भुईसपाट करत २ कोटी २० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर तालुका पोलिस व एलसीबीची संयुक्त कारवाई

८ फेब्रुवारी रोजी दुपारपासून सुरू असलेली गांजाची मोजणी काल दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संपली.

Sudarshan MH
  • Feb 10 2025 3:45PM
धुळे: शिरपूर तालुक्यातील आंबा शिवारातील वन जमिनीवरील गांजाच्या आधुनिक शेतीवर शिरपूर तालुका व एलसीबीच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल २ कोटी २० लाखांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. ८ फेब्रुवारी रोजी दुपारपासून सुरू असलेली गांजाची मोजणी काल दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संपली.
 
शिरपूर तालुक्यातील आंबा गाव शिवारातील रुपसिंगपाडा येथे वनजमीनीवर कैलास भावसिंग पावरा (रा.आंबा ता. शिरपुर) याने मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणार्‍या गांजा या अंमलीपदार्थाची व्यापारी प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी अवैधरित्या लागवड केली असल्याची गोपनिय माहिती काल दि.८ रोजी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखा व शिरपुर तालुका पोलिसांची दोन पथके तयार करुन संयुक्त कारवाईचे आदेश दिले. गांजाच्या पिकांची वाढ होण्यासाठी संपुर्ण शेतात ठिबक सिंचनाची व्यवस्था केलेली दिसून आली. याबरोबच मका, दादर पिकाच्या आड गांजाची लागवड केलेली होती.
 
त्यानुसार शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व एलसीबीचे सपोनि श्रीकृष्ण पारधी यांनी सर्व कायदेशीर प्रक्रीया राबवुन त्या ठिकाणी छापा टाकला. कैलास पावरा हा कसत असलेल्या या वनजमिनीवर गांजा अंमली पदार्थाची अवैधरित्या लागवड केलेली आढळून आली. मका व दादरच्या पिकाआड या गांजाची लागवड केलेली होती. ही गांजाची झाडे मजुरांमार्फत शक्त ती उपटण्यात व कापण्यात आली. एकुण २ कोटी २० लाखांची ११ हजार किलो गांजा वनस्पतीची हिरवी, ओली झाडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
याबाबत पोहेकॉ पवन गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपुर तालुका पोलीस ठण्यात गुंगीकारक औषधे द्रव्ये आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (आयआय) (क), २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई मनोज कचरे हे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार