पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता देशभरात कधीही लागू शकते.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाकडूनही तयारीचा आढवा घेण्यात येत आहे. या आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितलं की, व्हिडिओ रेकॉर्डसह घरी बसून दिव्यांग, 80 वर्षाच्या वरील नागरिकांना मतदान करता येणार आहे. यावर्षीपासून निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतल्याचं श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होतील. निवडणूकीची पूर्वतयारी दीड दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे.आता जिल्ह्यातील निवडणूक कार्यालयाला भेटी देण्याचं काम सुरू आहे. आज पुण्यात पहिली बैठक झाली असून निवडणूक आढावा बैठक घेतली.- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी.