सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुस्लिम मतांसाठी काँग्रेसचा मोठा सौदा? ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या 17 मागण्यांवर काँग्रेसचे आश्वासन

ऑल इंडिया उलेमा बोर्डाने काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी 17 मागण्या केल्या आहेत, ज्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

Sudarshan MH
  • Nov 6 2024 10:45AM
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम मतांचे गणित बरोबर बसवण्यासाठी काँग्रेसने ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या मागण्यांना होकार दिला आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. ऑल इंडिया उलेमा बोर्डाने काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी 17 मागण्या केल्या आहेत, ज्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
 
या मागण्यांमध्ये मस्जिद इमाम आणि मुअज्जिन यांना मासिक मानधन, 2012 पासून मुस्लिम समाजावर दाखल गुन्हे मागे घेणे, मुस्लिम तरुणांना पोलीस भरतीत प्राधान्य देणे, आणि वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे संरक्षण यांचा समावेश आहे. इतकेच नव्हे, तर आर.एस.एस. सारख्या संघटनांवर बंदी घालण्याचेही या मागण्यांमध्ये समावेश आहे.
 
काँग्रेसच्या या वागणुकीवर अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका विशिष्ट समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी काँग्रेस हे मतांचे राजकारण करत आहे का? त्याच वेळी, इतर समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष करून काँग्रेस फक्त मतांसाठी एवढी तडजोड करत आहे का, असा संतप्त सवाल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
 
या घोषणेने निवडणुकीत काँग्रेसला कोणत्या समाजाच्या भावनांचा आधार मिळेल, याचा अंदाज स्पष्ट होत आहे, पण बाकीच्या मतदारांमध्ये अस्वस्थता वाढणार आहे, हे निश्चित.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार