गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुस्लीम धर्मगुरु मुफ्ती सलमान अजहरीला रविवारी गुजरात पोलिसांनी घाटकोपरमधून अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर घाटकोपरमध्ये तणाव वाढल्याचं पहायला मिळालं. मिळालेल्या वृत्तानुसार, गुजरात पोलीस मुफ्ती सलमानला घेऊन मध्यरात्रीच गुजरातला रवाना झाले. तसेच त्याला दोन दिवसाची ट्रांझिट रिमांड देण्यात आली असल्याची माहिती वकील आरिफ सिद्धिकी यांनी दिली आहे. मुंबई पोलीस अजहरीला गुजरात बॉर्डरपर्यंत सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.
जुनागडमध्ये मुफ्ती सलमान अजहरीने भाषण देताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांनी मौलाना आणि अन्य दोघांविरोधात आयपीसीच्या कलम 153(सी), 505(2), 188 आणि 114 अंतर्गत गुन्हा नोंदवलाय. मौलाना सलमान अजहरीच्या प्रकरणात गुजरात पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) कलम 153 बी आणि 505 (2) अंतर्गत मोहम्मद यूसुफ मालेक आणि अजीम हबीब या दोन स्थानिक आयोजकांना अटक केली आहे.