मलकापूर: महाराष्ट्र शासनाद्वारे धार्मिक स्थळावरील लाऊड स्पीकर संदर्भात निर्धारित केलेल्या नियमांचे सर्रासपणे होत असलेले उल्लंघन थांबविण्या बाबत दिनांक 25 फेब्रुवारी रोजी ठाणेदार मलकापूर शहर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले. शहरात जुन्या गावांत जवळ जवळ असलेल्या धार्मिक स्थान वरून एकाच वेळच सोबत धार्मिक प्रार्थना भोंग्यांद्वारे वाजत असल्याने 10 वी 12 वी चे विद्यार्थी, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण, गर्भवती स्त्रिया यांना शारीरिक व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्र शासनाने धार्मिक स्थळावर लाऊड स्पीकर संदर्भात प्रमाण मर्यादा निर्धारित केलेले आहे. 2000 साली या संदर्भात कायदा करण्यात आला. ध्वनी प्रदूषण (कायदा आणि नियंत्रण) या नावाखाली. हा कायदा 1986 मध्ये झालेल्या पर्यावरण (संरक्षण) कायद्यांतर्गत येतो. कायद्याच्या पाचव्या कलमात सार्वजनिक ठिकाणी लाऊड स्पीकर आणि आवाजाची पातळी यावर विविध निर्बंध घातले आहेत. कोणताही कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात आयोजित करण्यासाठी किंवा ध्वनिक्षेपक लावण्यासाठी प्रशासनाकडून लेखी मान्यता घ्यावी लागणार आहे. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत सार्वजनिक ठिकाणी लाऊड स्पीकर वाजवले जाणार नाहीत असा कायदा आहे. त्या नियमावली प्रमाणे लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी रीतसर नोंद करून काढली असेल तर सकाळी 6.00 ते रात्री 10.00वाजे पर्यंत 55 डेसिबल स्वरूपात परवानगी काढून वाजवावी असा नियम आहे.
पण मलकापूर शहरामध्ये बऱ्याच धार्मिक स्थळांवरून दिवस तसेच रात्री काळात पाच ते सहा वेळा धार्मिक स्थानांवर लावलेल्या लाऊड स्पीकरवरून प्रार्थनेचा आवाज हे शासनाने दिलेले मर्यादा पार करून वाजवत आहे. सध्या 10 वी 12 वी विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. वाढलेल्या आवाजाने विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता त्रास होत आहे. तसेच स्थानिक रहिवासी यांना आरोग्यास ही धोका निर्माण होत आहे.
डॉक्टर अनुसार ध्वनीचे एका मर्यादेवर आवाज कानाद्वारे ऐकल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामध्ये कायमचे श्रवणशक्ती गमावीण्याचा धोका समाविष्ट आहे. बराच वेळ मोठा आवाज ऐकल्याने मानसिक समस्या उद्भवू शकतात. माणूस चिडखोर आणि हिंसक देखील बनू शकतो. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की सतत 85 डेसिबल पेक्षा जास्त आवाज ऐकल्याने बहिरेपणा येऊ शकतो. एकाग्रते वर परिणाम होऊ शकतो. मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम मोठा आवाज ऐकून उलट्याही होऊ शकतात. मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे, स्पर्श जाणवण्यात समस्या असू शकते. त्यामुळे रक्ताभिसरणाच्या गतीवरही परिणाम होऊ शकतो. सततच्या आवाजामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय 120 डेसिबलपेक्षा जास्त आवाज गर्भवती महिलेच्या गर्भावर परिणाम करू शकतो. त्याचवेळी 180 डेसिमल पेक्षा जास्त आवाज मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो.
सदर विषय खूप गंभीर आहे मलकापूर शहर मधील धार्मिक स्थळावर लावलेले व अनधिकृत वाजत असलेली भोंगे आवाज मर्यादा चेक करून तसे लेखी स्वरूपात आवाज मर्यादा पालन करण्याचे पत्र देऊन महाराष्ट्र शासनाचे कायद्याचे अंमलबजावणी व्हावी तसेच विनापरवानगी चे लावण्यात आलेले भोंगे काढण्यात यावे असे विनंती या निवेदन द्वारे विश्व हिंदू परिषद बजरंग दल द्वारे करण्यात आली. या प्रसंगी विश्व हिंदू परिषद बजरंग दल पदाधिकारी उपस्थित होते. सदर निवेदनाची प्रतिलिपी गृहमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य,मुख्य पोलीस अधीक्षक बुलढाणा,मुख्य कार्यकारी अधिकारी मलकापूर नगर परिषद यांना देण्यात आल्या आहे .
सुदर्शन न्यूज मराठी प्रतिनिधी - अनिलकुमार गोठी (मलकापूर)...