मुंबई: मुलुंड येथे काही मासे विकणार्यांविषयी ते बांगलादेशी असल्याचा संशय आल्याने सौ. अस्मिता गोखले आणि त्यांच्या सहकारी यांनी त्यांची चौकशी केली. मासेविक्रेत्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या महिलांनी संशयित बांगलादेशी मासेविक्रेत्यांना नवघर पोलिसांच्या ताब्यात दिले. व्हिडिओ प्रसारित करून त्यांनी याची माहिती दिली.
सौ. गोखले दोन - तीन दिवस मासेविक्रेत्यांना ‘कुठून आलात?’ असे विचारत होत्या. त्यावर ते त्यांच्याजवळ आधारकार्ड असल्याचे सांगत होते. त्यानंतर नाईलाजाने त्यांनी आधारकार्ड दाखवले असता ते कोरे करकरीत आणि बंगाली लिपीत लिहिलेले आढळले. सौ. गोखले यांनी पोलिसांना संपर्क केल्यावर दहाव्या मिनिटाला पोलिसांनी गाडी पाठवली आणि ८ जणांना घेऊन गेले. यानंतर परत तिथे ३ जण आलेले आढळले. त्यांच्याजवळही कोरे आधारकार्ड होते. त्यांनी भिवंडीत रहात असल्याचे सांगून बंगालमध्ये व्यवसाय होत नसल्याने इथे आल्याचे सांगितले. संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकार्याने सांगितले, की ‘‘ही समस्या सगळीकडे आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षारक्षक म्हणून एका बांगलादेशीला अटक केली आहे. त्याच्यावर खटला भरला आहे.’’