मुंबई: बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी आणलेल्या बोकडाच्या पोटावर ‘राम’ लिहून त्याची विक्री करणार्या ३ जिहाद्यांना सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री स्वरूप पाटील यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. महंमद शफी शेख, साजीद शेख, कय्युम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
स्वरूप पाटील यांना काही धर्माभिमान्यांनी 'येथे एका दुकानात बकरी ईदच्या कुर्बानीसाठी आणलेल्या एका बोकडाच्या पोटावर ‘राम’ असे लिहिले असून त्याला क्रूरतेने वागणूक देण्यात येत आहे, तसेच त्याला हत्येच्या उद्देशाने बांधून ठेवले आहे’, अशी माहिती दिली होती. त्यानुसार पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली. पोलिसांसह संबंधित दुकानात जाऊन बोकड, रंगाचा डबा आणि ब्रश कह्यात घेतला.