कणकवली: कणकवलीतील एका लॉजमध्ये बांगलादेशी महिला देहविक्रय व्यवसाय करीत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कणकवलीतील एक मराठी तरुण हा लॉज चालवित होता. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली शहरातील लक्ष्मी लॉजचा मॅनेजर ओंकार विजय भावे (वय ३२) याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली. बांगलादेशी महिलांकडून लॉजवर देह विक्रय व्यवसाय करून घेत असल्याचा त्याच्यावर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
एटीएस पथकाने पकडलेल्या दोन बांगलादेशी महिलांकडून शहरातील लक्ष्मी लॉजवर देह विक्री व्यवसाय करवून घेत असल्याचे कणकवली पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सोमवारी रात्री आठच्या सुमारास कणकवली पोलिसांनी लॉजचा मॅनेजर ओंकार विजय भावे याला ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी अधिक तपासासाठी न्यायालयाने भावे याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या दोन बांगलादेशी महिलांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून त्या दोघींना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.