वायुसेनेचे प्रताप हेलिकॉप्टर आता फुटाळा चौपाटीचं सौंदर्य वाढवणार...
भारतीय वायुदलाने दोन हेलिकॉप्टर सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यासाठी दिली आहेत. एक नागपूरमध्ये, तर दुसरा चंदिगडमध्ये ठेवण्यात आला. 60हून अधिक देश या हेलिकॉप्टरचा वापर करतात. हे सर्वाधिक उत्पादित केले जाणारे विमान आहे.
कारगील युद्धाबरोबरच तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि तत्कालीत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सेवेतील भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर आता फुटाळा चौपाटीचं सौंदर्य वाढवणार आहे. एम आय सेव्हन हेलिकॉप्टर फुटाळा परिसरात ठेवण्यात आलंय. २०२० पर्यंत ते हे हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेच्या सेवेत होतं. जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या हेलिकॉप्टरमध्ये एमआय सेवनचा समावेश आहे. आता हे हेलिकॉप्टर फुटाळा चौपाटीवर बसवण्यात आलंय. त्यामुळे हेलिकॉप्टर बघणारे आता फुटाळा चौपाटी परिसरात यायला लागलेत.
संबंधित हेलिकॉप्टर वायूसेनानगर एअरफोर्स स्टेशनमध्ये ठेवले होते. तिथून ते महामेट्रोला देण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळी फुटाळा तलावाच्या काठावर आणण्यात आले. हे हेलिकॉप्टर आठ फुटांच्या प्लाटफार्मवर बसविण्यात आले आहे. 2020 पर्यंत हे हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेच्या सेवेत होते. सोव्हिएय युनियनमध्ये तयार करण्यात आले होते. राष्ट्रपती, पंतप्रधान अशा व्हीव्हीआयपींच्या उड्डाणासाठी या हेलिकॉप्टरचा वापर होत होता. भारतीय वायुदलाकडे 107 एमआय एट हेलिकॉपर्टस होते. प्रताप असे नाव या हेलिकॉप्टरला दिले गेले होते. पूर तसेच आपातकालिन व्यवस्थेतही या हेलिकॉप्टरचा वापर केला गेलाय.
या हेलिकॉप्टरमध्ये चार टन माल वाहून नेण्याची क्षमता आहे. शौचालयाचीही याठिकाणी सुविधा आहे. भारतीय वायुदलाने दोन हेलिकॉप्टर सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यासाठी दिली आहेत. एक नागपूरमध्ये, तर दुसरा चंदिगडमध्ये ठेवण्यात आला. साठहून अधिक देश या हेलिकॉप्टरचा वापर करतात. हे सर्वाधिक उत्पादित केले जाणारे विमान आहे. वायूदलाच्या विशेष मोहिमेसाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जात होता. सियाचेन ग्लेशियरमधील ऑपरेशन मेघदूत तसेच श्रीलंकेतील ऑपरेशन पवनमध्ये या हेलिकॉप्टरने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प