Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर आले आहेत. असे असतानाच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला सरकारने २० लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
पहलगामधील घनदाट जंगलांत दहशतवाद्यांचा शोध चालू आहे. पुढचे काही दिवस ही शोध मोहीम चालूच राहणार आहे. या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना २० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहलगामवरील हल्ल्याचा कट पाकिस्तानातील रावळपिंडी येथेच शिजला असल्याचे सांगण्यात येत आहे.