सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कचऱ्यातून भंगार गोळा करणाऱ्या दहा वर्षीय मुलीवर अत्याचार; परभणीत दोघांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत दोघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Feb 28 2025 3:23PM
परभणी: कचरा वेचून भंगार गोळा करणाऱ्या एका दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी (दि.२४) घडली. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत दोघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पीडित दहा वर्षीय मुलगी कचरा वेचून भंगार गोळा करण्याचे काम करते. सोमवारी (दि.२४) पीडिता व इतर दोन मुली दुपारी ३ वाजेच्या सुमारास भंगार गोळा करण्यासाठी हडकोलगत असलेल्या कालवा परिसरात गेल्या होत्या. एका गाडेवाल्याने त्यांना टरबुज दिले. ते त्यांनी मंदिराजवळ बसून खाल्ले. त्यानंतर बराच वेळ त्या खेळत होत्या, सायंकाळी निळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन तरुण आले. एकाच्या गळ्यावर मंगू असे गोंदलेले होते. दोघांच्या बोलण्यातून एकाचे येमा व दुसऱ्याचे नाव बाळा असल्याचे मुलींनी सांगितले. येमा नावाच्या तरुणाने पीडित अल्पवयीन मुलीस गाडीवर बसण्यास सांगितले. मात्र तिने नकार दिला असता दोघांनी जबरदस्तीने तिला गाडीवर बसवून निघून गेले. सोबतच्या इतर मुलींनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मुलींना ढकलून दिले. एका पडक्या घरात नेऊन त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. मुलीने घर गाठून घडला प्रकार आईला सांगितला. मंगळवारी (दि.२५) याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन नवामोंढा पोलिस ठाण्यात येमा (पूर्ण नाव माहित नाही) बाळा (पूर्ण नाव माहित नाही) या दोघाविरुध्द कलम १३७(२), ९६,६४, ६५(२),६४ (आय), ७०(१), ११५(२). ३५१ (३), ३(५) भान्यासं सह कलम ४, ६, ८, १०, १२ बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम सन २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास नवामोंढा पोलिस करीत आहेत.

 

सुदर्शन न्युज मराठी प्रतिनिधी - वसंत आवटे (परभणी)...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार