सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंदुत्वासाठी उभा महाराष्ट्र पिंजून काढणारे ह. भ. प. शिरीष महाराज मोरे यांचे आकस्मित निधन

प्रखर हिंदूत्ववादी विचारवंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप शिरीष महाराज मोरे यांच्या अशा अकाली जाण्याने सकल हिंदू समाजाला मोठा धक्का मानला जात आहे.

Sudarshan MH
  • Feb 5 2025 1:24PM

देहू: संत तुकाराम महाराजांचे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष महाराज मोरे (वय - ३० वर्ष) यांचे आज सकाळी आकस्मित निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सकल हिंदू समाजावर शोककळा पसरली आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज होते. शिवव्याख्याते म्हणून मोरे महाराज यांचा मोठा नावलौकीक होता. दुर्दैव म्हणजे नुकताच त्यांचा विवाह ठरला आणि टीळासुध्दा झाला होता.

ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा, असे आवाहन शिरीष महाराज हे हिंदूंना करत असायचे. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत असतं. ’लव्ह जिहाद’, ’उद्योग जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’, ’फूड जिहाद’, धर्मांतरणासारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजले होते. ह. भ. प. शिरीष महाराज मोरे यांच्या अकाली जाण्याने सकल हिंदू समाजावर एकच शोककळा पसरली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार