सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यातील सर्वात मोठा सर्वपक्षीय ओबीसी- व्हीजेएनटी आरक्षण बचाव जागर मेळावा लातुरात

ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातून विविध पक्ष व संघटनाच्या वतीने आंदोलने छेडली जात असताना या आंदोलनाला वेगळी दिशा देऊन मागणी संदर्भात जनजागृती व आंदोलनात सुसुत्रता आणण्यासाठी लातूर येथे ओबीसी आरक्षण जनजागृती जागर मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याने आरक्षण लढ्याला दिशा देण्याचे काम होईल असा आशावाद उपस्थितीत सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. राज्यपातळीवरील मान्यवरांनीही या मेळाव्यात मार्गदर्शन करून आपण आरक्षणाच्या मागणीसाठी कायम सोबत असल्याचे सांगितले

s.ranjankar
  • Jul 26 2021 1:10PM
लातूर: ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातून विविध पक्ष व संघटनाच्या वतीने आंदोलने छेडली जात असताना या आंदोलनाला वेगळी दिशा देऊन मागणी संदर्भात जनजागृती व आंदोलनात सुसुत्रता आणण्यासाठी लातूर येथे ओबीसी आरक्षण जनजागृती जागर मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याने आरक्षण लढ्याला दिशा देण्याचे काम होईल असा आशावाद उपस्थितीत सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. राज्यपातळीवरील मान्यवरांनीही या मेळाव्यात मार्गदर्शन करून आपण आरक्षणाच्या मागणीसाठी कायम सोबत असल्याचे सांगितले.ओबीसी आरक्षण पुनर्स्थापीत करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीयांनी लातूरच्या भुमीतून वज्रमुठ आवळली. लातुरतील हा मेळावा ओबीसी आंदोलनास नवी दिशा देणारा ठरणार आहे. लातूर मधील जागर मेळावा हा ओबीसींचा राज्यातील सर्वात मोठा मेळावा ठरला असून यापुढे ओबीसींनी अधिक आक्रमक पवित्रा घेत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण स्थगीत केल्यानंतर ते पुनर्स्थापीत करावे या मागणीसाठी ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शनिवारी लातूर येथे आरक्षण बचाव जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ विधिज्ञ अण्णाराव पाटील यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या मेळाव्यास राज्यपातळीवरील नेत्यांनीही संबोधीत केले. राज्याचे मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, भाजपा ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ऑनलाईन माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.   यावेळी आ. राजेश राठोड, माजी आ. रामराव वडकुते, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख, राज्यातील ओबीसी समंवयक बालाजी शिंदे, दादासाहेब मुंडे, नवनाथ पडळकर, सुशीलाताई मोराळे,  मुख्य संयोजक ॲड गोपाळ बुरबुरे, रघुनाथ मदने, आयुब मणियार, प्रा. एकनाथ पाटील, सुरज राजे, अनिल पुरी,  श्रीनिवास अकनगिरे, राजेश खटके, व्यंकट पन्हाळे, हरिभाऊ गायकवाड, नगरसेवक राजा मणियार, सौ सपना कीसवे,  विजयकुमार साबदे, शरद पेठकर, चंद्रकांत मद्दे, मंजुषा कुटवाडे,  गोविंद चोपणे, अनिल कुटवाडे, प्रा धनंजय बेडदे,   विजयकुमार पिनाटे,धर्मवीर भारती, भाऊसाहेब शेंद्रे,ओमप्रकाश आर्य,राजपाल भंडे,जगन्नाथ गवळी,चंद्राकांत सुर्यवंशी ,कुमार श्रीमंगले, श्रीकांत मुद्दे, सुरज राजे, ताहेर सौदागर, नगरसेविका सपना किसवे, नामदेव ईगे, अविष्कार गोजमगुंडे, अजीज बागवान, अशोक मलवाडे, अजित निंबाळकर, दगडूसाहेब पडिले, रंगनाथ घोडके, राहुल जाधवर, राजेश गुंठे, राम गोरड, प्रदीपसिंह गंगणे,  विशाल चामे, विजय टाकेकर, अनंत चौधरी संजय शिरसागर, प्रमोद पांचाळ, इस्माईल फुलारी, शिवाजी पन्हाळे, चेतन कोल्हे, अनिरुद्ध येचाळे, एच व्ही निंबाळकर, विजय खोसे, उमेश कांबळे, केदार सर, नवनाथ गोजमगुंडे, सुरज कोल्हे, रामचंद्र केंद्रे, आशिष पडिले, संतोष पांचाळ, पद्माकर उगीले, व्यंकटेश पुरी, करीम तांबोळी, रंगनाथ घोडके, सुधीर अनवले, बाळकृष्ण धायगुुडे, मंगेश सुवर्णकार, सर्फराज मणियार, नेताजी बादाडे यांच्यासह मान्यवरांनी आपआपल्या संस्था व संघटनाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा व्यक्त केला. ओबीसी आरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेला हा सर्वात मोठा मेळावा ठरला. या मेळाव्यात आंदोलनाला दिशा मिळेल असा आशावाद निर्माण झाला. आरक्षण पुनर्स्थापित व्हावे यासाठी त्या-त्या विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार व खासदारांना निवेदने द्यावीत. आरक्षण जोपर्यंत पुनर्स्थापीत होणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणूका घेऊ नयेत असे ठरावही या मेळाव्यात घेण्यात आले. विविध संस्था संघटनाच्या वतीने यावेळी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा व्यक्त करणारी पत्रे यावेळी समितीकडे सुपूर्द करण्यात आली.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार